मुंबई: लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहे, मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींची (Ladki Bahin Yojana) केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार  शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे. अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे.(Ladki Bahin Yojana) 

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana : त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच त्याचबरोबर..

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जात आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईल, त्यानंतर त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत, शिवाय त्यांची पगारवाढही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.अधिक उत्पन्न असतानाही योजनेचा लाभ

Ladki Bahin Yojana : पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेचे रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहीणचे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana : १ काेटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी

आत्तापर्यंत राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपैकी आतापर्यंत १ कोटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. अद्यापही १ कोटीवर महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे. एवढ्या वेळेत ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र त्याही वेळेत ईकेवायसी पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत, त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपले ईकेवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) त्यांच्या सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.राज्यातील काही भागात पूराची स्थिती निर्माण झाल्यामुळे, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आलं नव्हतं. अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.