Nagpur : नागपूरच्या अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बेसा परिसरात सेंट्रल बँक कॉलनी कॉम्प्लेक्समध्ये निर्माण कार्य सुरू असलेल्या एका घरात मजुराचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव धरमसिंग उईके (वय 30) असे आहे, तो मध्य प्रदेशातील मांडला येथील रहिवासी असून तो काही काळापासून नागपुरात मजूर म्हणून काम करत होता. 

Continues below advertisement

अपघात की घातपात, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार

बेसा रोडवरील सेंट्रल बँक कॉलनी कॉम्प्लेक्समध्ये राकेश गोलार यांच्या मालकीच्या घरावर बांधकामात धरम सिंग काम करत होता. तो रात्री घराच्या वरच्या मजल्यावर राहत होता. गुरुवारी सकाळी10  वाजताच्या सुमारास हलीम नावाचा कामगार घटनास्थळी पोहोचला आणि त्याला धरम सिंगचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. हलीमने ताबडतोब कंत्राटदाराला घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्याने पोलिसांना कळवले. पोलिस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचली आहे. चौकशी अहवाल तयार केला असून, मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. दरम्यान, धर्मसिंगचा मृत्यू अपघात होता की काही घातपात आहे, हे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.

नांदेडच्या माहूर तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ

नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माहूर तालुक्यातील पाचोन्दा शिवारात आज दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) असी मृत महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला दुपारच्या सुमारास अंदाजे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात कापूस वेचत होत्या. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी काही ठिकाणी धक्काबुक्कीचे चिन्हे आढळल्याने, हा प्रकार केवळ खून नसून लूटमारीचा प्रयत्न असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोघींच्या अंगावरील दागिने किंवा रोख रक्कम गायब असल्याचीही माहिती काही स्थानिकांकडून पुढे आली असून, पोलिसांकडून याची पडताळणी सुरू आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

नांदेड हादरलं ! गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली घटना