पुणे/पिंपरी : पुण्यानंतर आता पिंपरीमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील हा एक भाग असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र आत्ताच सुरु झाली आहे. त्यामुळे पुण्यात किंवा पिंपरीत कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्यांची आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांची आता खैर नाही.

काल आणि आज या दोन दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 36 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आठ प्रभागातील पथकांकडून ही कारवाई शहरभर सुरु आहे. थुंकणाऱ्यांसोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जात आहे.

असे आहेत दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - 150 रुपये दंड

रस्त्यावर अस्वच्छता पसरवणे - 180 रुपये दंड

उघड्यावर लघुशंका करणे - 200 रुपये दंड

उघड्यावर शौच करणे - 500 रुपये दंड

दंड न भरल्यास पोलिसांत तक्रार दिली जाऊ शकते. सामान्यांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.