मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)  फुटलेल्या सात आमदारांचा अहवाल काँग्रेस (Congress) पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलाय..विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याची माहिती आहे. त्यानुसार काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि इतर नेत्यांनी बैठक घेऊन अहवाल दिल्लीला पाठवलाय. जर आता कारवाई केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यातल्या नेत्यांनी केलीय.


काँग्रेस नेते  आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले,  नांदेडमुंबईच्या काँग्रेस आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केले आहे. आमच्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे.   बॅलेटवर आमदारांना विशिष्ट फॉरमॅट मध्ये मतदान करायचे होते, ज्यांनी त्या फॉरमॅटचे उल्लंघन केले त्यांना आम्ही ट्रॅप केले व त्या आमदारांची ओळख पटवली.  यात आमच्या पाच आमदारांनी क्रॉस वेटिंग केले त्यांचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे.


एक आठवड्याच्या आत कारवाई अपेक्षित : विजय वडेट्टीवार 


क्रॉस वोटिंग  करणाऱ्या आमदारांवर  एक आठवड्याच्या आत त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या वेळेस कारवाई न झाल्याने बंडखोरांची हिंमत वाढली आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या वेळेस कारवाई न झाल्याने बंडखोरांची हिंमत वाढली असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.


काँग्रेसची आठ मतं फुटली?


दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची एकूण 8 मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान  न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.


Video :कुणी गद्दारी केली आम्हाला सर्व माहितीय :विजय वड्डेटीवार



हे ही वाचा :


क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी, म्हणाले..