नागपूर : नागपुरात 13 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या घटनेचा आरोपी प्रवीण बक्सरे कुख्यात गुंड असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला पोलिसांनी दोन वर्षासाठी नागपुरातून तडीपार केले होते. मात्र तरीही तो नागपुरात राहत होता आणि गुन्हेगारी करत होता.
4 ऑगस्ट 2018 रोजी पीडित मुलगी शाळेतून परतत होती. त्यावेळी आरोपी प्रवीणने अजनी परिसरातून तिचं अपहरण केलं आणि मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर आरोपी प्रवीणने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेच्या काही दिवसानंतर पिडीत मुलीने हिंमत करुन घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आज पीडित मुली आणि तिच्या कुटुंबीयांनी अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी लगेच आरोपी प्रवीण बक्सरेला अटक केली.
आरोपी गुंड प्रवीण बक्सरे गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीच्या मागे लागला होता. मात्र, मुलीने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळेच रागावलेल्या गुंडाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपी गुंड प्रवीण बक्सरेवर याआधीही हत्या, घरफोडी, खंडणी वसुली, अवैध दारुची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे तो नागपुरात राहत होता आणि आता त्याने शाळकरी मुलीवर अपहरण करुन बलात्कार केला आहे.
नागपुरात तडीपार गुंडाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2018 10:06 PM (IST)
4 ऑगस्ट 2018 रोजी पीडित मुलगी शाळेतून परतत होती. त्यावेळी आरोपी प्रवीणने अजनी परिसरातून तिचं अपहरण केलं आणि मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -