विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहात आमदार रमेश कदम यांच्या नावावर रुमही बुक करुन नंतर खाडाखोड केल्याचं समोर आलं आहे.
काय घडलं?
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी रमेश कदम यांना बीडमधील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, पोलिसांनी त्यांना लॉकअपमध्ये न ठेवता थेट शासकीय विश्रामगृहात ठेवलं.
विशेष म्हणजे बीड शहरातमध्ये एक कारागृह, तीन मोठे पोलीस स्टेशन आहेत तरीही रमेश कदम यांची शाही व्यवस्था विश्रामगृहात का केली, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम हे आरोपी आहेत.
- कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
- उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
- नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
- अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
- लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
- महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले
- विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप