सिंधुदुर्ग : कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये ही घटना घडली आहे. संजय जोशी आणि सायली जोशी असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. देवगडमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला, यात जोशी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. 

Continues below advertisement


आज संध्याकाळच्या सुमारास देवगडमधील नाडण येथील जोशी दाम्पत्य दुचाकीने रेडी रेडव या सागरी महामार्गाने नाडणवरून देवगडला कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.


रेडी रेवस या सागरी महामार्गावर वाडा सडेवाडी येथे टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरुन जात असलेले संजय जोशी व सायली जोशी दोघे जागीच ठार झाले. कोविडची लस घेण्यासाठी हे जोशी दांपत्य देवगड ग्रामीण रुग्णालयात जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार फकरुद्दीन आगा, गणेश चव्हाण आदींनी घटनास्थळी पंचनामा केला.