पुणे : कंटेनर आणि वॅगन आर कार यांच्यात झाला भीषण अपघातात एकाच परिवारातील चार जणांचा जागीच मृत्यू आहे. पुणे नगर महामार्गावर शिरूर येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात वडिलांसह 20 दिवसाचं बाळ आणि अन्य दोघांचा समावेश आहे.
वॅगनर कार अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
किशोर माधव हाके, शुभम माधव हाके, विमल माधव हाके अशी मृतांची नावे आहेत. या तिघांसह अवघ्या 20 दिवसांचं बाळदेखील या अपघातात मृत्यूमुखी पडले आहे. या अपघातात पुष्पा किशोर हाके या गंभीर जखमी झाल्या आहेत. शिरूर बाह्यरस्त्यांवरील पाचर्णे मळा येथे कंटेनरला मारुती वॅगन आर कारने पाठीमागून धडक दिली.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये किशोर आणि शुभम हे दोन सख्खे भाऊ, एक वीस दिवसांचे बाळ आणि बाळाच्या आजीचा समावेश आहे. मूळचे नांदेड येथील असणाऱ्या किशोर यांना 20 दिवसांपूर्वी आपत्य झाले होते. बाळासह आईला पुण्याला घेऊन येताना काळाने घाला घातला. या अपघातात आई थोडक्यात बचावली आहे.
कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 20 दिवसाच्या बाळासह एकाच परिवारातील चौघांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2019 03:08 PM (IST)
वॅगनर कार अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -