आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली, असे ठाकूर यावेळी म्हणाले. यावेळी मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी मित्र पक्षांची मतांची लायकीही हितेंद्र ठाकूरांनी काढली आहे. लायकी जास्त होती तर मतं का कमी पडली? असा सवालही त्यांनी केला. आम्हीही त्यावेळी चोर होतो. आमचा अध्यक्ष देखील त्यामध्ये होता. मात्र आता आपण एकत्रित आहोत, असे ते म्हणाले. यावेळी बहुजन विकास आघाडी बरोबर असलेल्या मित्र पक्षाचा चांगलीच गोची झाली होती.
यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. उद्धव ठाकरे इकडे येऊन म्हणतात की आम्ही गुंड आहोत, बाळासाहेब म्हणायचे गुंड चालेल पण षंड नको. मग मी गुंड आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले.
यावेळी भाषणाचा शेवट करताना 'आपलं मत शिट्टीला' असं ठाकूर म्हणालेय यावेळी सभेत हशा पिकला. त्यावेळी कुणी पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरु शकत नाही, असे ठाकूर म्हणाले. यावेळी आपली निशाणी चोरली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हितेंद्र ठाकूर यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- शिवसेनेमधील जोश संपला, नंदुरबारच पार्सल दत्तक घेतलं
- वणगा कुटुंबाची शिवसेनेने वाट लावली
- उद्धव ठाकरे यांनी आधीच खासदार जाहीर केला, याला गाजर दिला
- बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
- आनंद दिघेंना मान होता आता दाढी वाढवून दिघे बनण्याचा प्रयत्न (एकनाथ शिंदे यांना टोला)
- सत्तेचा मिजास आला आहे, मात्र यावेळी मतदार तो उतरवणार
- जाहिरात बघून तेल आणि साबण ठीक आहे, पण मात्र पंतप्रधान नको
- कुपोषण आजही सुरूच,कुपोषणावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही
- आदिवासी विकास मंत्री स्वतःच कुपोषणाच मॉडेल
- माऊ म्हणजे मांजर नाही माननीय उद्धव ठाकरे
- माऊ म्हणजे मांजर नाही माननीय उद्धव ठाकरे
- कुठे नेवून ठेवलीय शिवसेना माझी ? बाळासाहेबांना प्रश्न पडला असेल