सोलापूर : कर्नाटकात झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाणगापूरला दत्त दर्शनाला जाताना ही दुर्घटना घडली.

 
ट्रक आणि क्रूझरच्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना कलबुर्गी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

 
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कनगरामधील आहेत. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद गावाजवळ हा अपघात झाला.