अंत्यविधी आटोपून परतणाऱ्या गाडीचा अपघात, सहा महिलांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2018 10:38 AM (IST)
नातेवाईकाचे अंत्यविधी करुन परतणाऱ्या गाडीचा बेळगावमधील गोकाक तालुक्याजवळ काल रात्री अपघात झाला. या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहेत.
बेळगाव : नातेवाईकाचे अंत्यविधी करुन परतणाऱ्या गाडीचा बेळगावमधील गोकाक तालुक्याजवळ काल रात्री अपघात झाला आहे. या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहेत. सर्व मृत महिला व जखमी सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी आहेत. कसा झाला अपघात? गोकाक फॉल्स (गोकाक धबधबा) जवळच्या गावात नातेवाईकाचे अंत्यविधी आटोपून सौंदत्ती तालुक्यातील लोक त्यांच्या घरी परतत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेला ट्रक उभा होता. कार चालकाला तो ट्रक दिसला नाही. त्यामुळे कारने ऊसाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या आपघातात कारमधील सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या 10 जणांना गोकाक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत पावलेल्या महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गोकाक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.