मुंबई: बाबरी मशीद पाडल्याचा अभिमान मुख्यमंत्र्यांना भोवणार असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानावर कॉंग्रेस नेते संजय निरुपम आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


कॉंग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, "काल मुख्यमंत्र्यांनी बाबरी उद्धस्त केल्याचा जल्लोष केला आणि उपस्थित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्या भाषणाचा आनंद घेतला. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे? ओवैसींच्या विषारी रोपट्याचा वाढ होण्यासाठी हे पोषक नाही का?"


समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनीही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत".


जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती


अबू आझमी पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नसून ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी अशा पद्धतीचं विधान करायला नको हवं होतं. हे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालतंय. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सरकारातील मुस्लिम नेत्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे."


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बाबरी मशीदीच्या विषयावरुन बोलताना भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. बाबरी पडल्यानंतर सगळे पळून गेले होते पण बाळासाहेब एकटे ठामपणे उभे होते. बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान असल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं."


'अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय झाला पण तब्बल 22 वर्षांनी, उस्मानाबादच्या शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा