मुंबई : सामाजिक बांधिलकी जपत बातमी पलिकडे जात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याबद्दल 'एबीपी माझा'ला अफॅक्स तर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अफॅक्सच्या पुरस्कारांमध्ये एबीपी न्यूज नेटवर्कला एकूण पाच पुरस्कार मिळाले आहेत. 'माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र' या सामाजिक उपक्रमासाठी 'एबीपी माझा'ला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेचा संदेश देत जास्तीत जास्त लोकांना एकत्रित आणण्याचे काम 'एबीपी माझा'ने केले आहे.


माध्यम क्षेत्रातील नावाजलेल्या अफॅक्स या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये यंदा एबीपीने बाजी मारली आहे. एबीपी माझा सह एबीपी न्यूज, एबीपी आनंदा या वाहिन्यांना अॅफेक्सच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अफॅक्सतर्फे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध विभागात हे पुरस्कार देण्यात येतात. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, टीव्ही चॅनल, रेडिओ, ऑनलाईन पब्लिशर यांच्यापैकी चांगली कामगिरी करणाऱ्यांना वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी आनंद चक्रवर्ती, अनिता नायर, चंद्रमोहन मेहरा, गरीमा खंडेलवाल, जसकरन सिंह, तुषार व्यास, जोसी पॉल यांनी परिक्षण केले आहे.

'एबीपी ग्रुप'ला मिळालेले पुरस्कार :
बेस्ट सीएसआर इनिशिएटिव्ह : एबीपी माझा (माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र)
बेस्ट आयपीआर इव्हेंट : एबीपी आनंदा (शरद आनंदा)
बेस्ट प्रिंट अॅड : एबीपी न्यूज (कौन बनेगा प्रधानमंत्री)
बेस्ट ट्रेड मिडीया कॅम्पेन : एबीपी न्यूज (प्रेडिक्ट टू विन कॉन्टेस्ट)
बेस्ट व्हिडीओ प्रोमो : एबीपी आनंदा (कार डोकलो ग्राम बांगला)