एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 मे 2019 | शुक्रवार

  1. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, अमित शाह गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षणमंत्रिपदी, निर्मला सीतारमण पहिल्या स्वतंत्र महिला अर्थमंत्री


 

  1. नव्या मंत्रिमंडळातही नितीन गडकरींकडे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, प्रकाश जावडेकर माहिती आणि प्रसारण मंत्री, तर रावसाहेब दानवेंना ग्राहक संरक्षण आणि संजय धोत्रेंना मनुष्यबळ विकास आणि आयटी


 

  1. यावेळीही अवजड उद्योग मंत्रालय दिल्याने शिवसेनेचे अरविंद सावंत नाराज असल्याची चर्चा, तर मंत्रिपदावर शिवसेना समाधानी असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया


 

  1. अमित शाह गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी जे.पी. नड्डांच्या नावाची चर्चा, तर राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत


 

  1. लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीची शक्यता, शरद पवार नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती


 

  1. ईव्हीएममध्ये वायफाय लावून छेडछाड केल्याचा राजू शेट्टींचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळला


 

  1. सुप्रीम कोर्टाने 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी यावर्षीसाठी रद्द केल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी पीजी मेडिकल प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा पर्याय, 4 जूनपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ


 

  1. शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ, मोदींच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय


 

  1. नाशिकमध्ये ‘डॅशिंग लेडी’ सविता मुर्तडक यांनी शस्त्रधारी दरोडेखोरोला रोखलं, स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातला थरार, घटना सीसीटीव्हीत कैद


 

  1. अंदमानमध्ये मान्सूनच्या ढगांची गर्दी, परिस्थिती अनुकूल राहिल्यास केरळमध्ये 6 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन, तर 10 जूनला कोकणात धडक, मान्सून सर्वसामान्य, आयएमडीचा अंदाज


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK