सांगली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले तालुका मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा मतमोजणीत अधिक मतदान आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याआधीही तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केलं होते. पण आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ईव्हीएममध्ये वायफाय लावून छेडछाड केल्याचाही केल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.


Mane meets Shetti | खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी | कोल्हापूर | ABP Majha



याआधी केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेली मते यांच्यात विसंगती नसल्यांच स्पष्ट केलं होतं. तसेचं वाढीव दिसत असलेले मतदान मतमोजणीच्या दिवशीची लिपिकीय चूक असू शकते असेही जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिलं आहे. तसेच राजू शेट्टी यांना याबाबत लेखी कळवण्यात येणार असून त्यांची ही शंका दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा दारुण पराभव केला. राजू शेट्टींनी पराभवानंतर निवडणुकीत पडलेल्या मतांची बारकाईने पाहणी केली असता, यामध्ये तफावत असल्याचं दिसून आलेला आहे . एकूण 17 उमेदवारांना ईव्हीएम द्वारे झालेले मतदान 1245797 मतदान आहे. तर ईव्हीएम मधून मोजलेली मते 1246256 आहेत या मध्ये ईव्हीएममधून 459 मते अधिक असल्याचे समोर आले. या घोळाच्या निर्दशनातून राजू शेट्टी यांनी ईव्हीएममधील घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.

Raju Shetti Meets Raj Thackerey | राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha