एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 सप्टेंबर 2019 | शनिवार
घोटाळ्यांच्या आरोपावरून पत्रकार परिषदेत अजित पवारांना अश्रू अनावर, माझ्यावरील गुन्ह्यामुळे शरद पवारांची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचंही स्पष्टीकरण
'शेती करण्याचा सल्ला पार्थला, साहेब म्हणाले तुला बारामती लढवावी लागेल’ पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण
अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही, अजित पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती
शिवसेनाप्रमुखांना वचन दिलंय, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन, महाराष्ट्रात भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा विश्वास
महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंग प्रकरणी भंडाऱ्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारेंना अटक, कोठडीत रवानगी
“भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला”, संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सूचक इशारा
जम्मू काश्मिरमध्ये एका दिवसात तीन चकमकी, लष्कराकडून सहा दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
आयएनएस खांदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण, भारतीय नौदलाची ताकद वाढली
प्रलंबित खटल्यांमध्ये तारीख पे तारीख देऊ नका, निकालासाठी अवधी निश्चित करा, ज्येष्ठ विधिज्ञ पी. परमेश्वर राव यांच्या पुस्तकप्रकाशनावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंचा सल्ला
गानसम्राज्ञी लतादीदींचा नव्वदावा वाढदिवस, जगभरातून दीदींवर शुभेच्छांचा वर्षाव