एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 डिसेंबर 2018 | शुक्रवार

  1. 12 वर्षाखालील मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता मृत्युदंडाची शिक्षा, POCSO कायद्यात महत्त्वपूर्ण बदल, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/koLkU3


 

  1. अहमदनगरमध्ये भाजपकडून गोवा पॅटर्नची पुनरावृत्ती, फक्त 14 नगरसेवक असताना राष्ट्रवादीच्या साथीने महापौर आणि उपमहापौरपदावर कब्जा, बाबासाहेब वाकळे नवे महापौर https://goo.gl/CJcwuy


 

  1. कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारी रोजी सभा घेण्यास परवानगी, पुणे पोलिसांचा निर्णय, पाच मैदानांवर वेगवेगळ्या संघटनांच्या सभा होणार https://goo.gl/NtsKX4


 

  1. ग्राहकांना पसंतीचं स्वातंत्र्य देणाऱ्या केबल धोरणाला एक महिन्याची मुदतवाढ, नवे नियम उद्याऐवजी 31 जानेवारीपासून लागू होणार https://goo.gl/xJnTVw


 

  1. लातूरमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक, क्लास चालकांकडून खंडणीसाठी मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप https://goo.gl/Z6JCPt


 

  1. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांना ब्लेझर सक्तीचा निर्णय मागे, शिक्षक संघटनांच्या दबावामुळे निर्णय मागे घेण्याची जिल्हा परिषदेवर नामुष्की https://goo.gl/vW2PXA


 

  1. मुंबईत सांताक्रुझ परिसरातून एक हजार कोटींचं फेंटानिल ड्रग जप्त, चौघांना अटक, अॅन्टी नार्कोटिक्स विभागाची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई https://goo.gl/Yxv28r


 

  1. एसटी चालक-वाहकांना महामंडळाकडून नवीन वर्षाची सुखद भेट, 3307 कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात विनंती बदली मिळणार, परिवहन मंत्र्यांचे आदेश https://goo.gl/GFBBMH


 

  1. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला हायकोर्टाची सशर्त परवानगी, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार 75 डेसिबल आवाजाची मर्यादा पाळण्याचे आयोजकांना निर्देश https://goo.gl/2CJjDU


 

  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाची दुसऱ्या डावात घसरगुंडी, तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या पाच बाद 54 धावा, टीम इंडियाच्या हाताशी 346 धावांची आघाडी https://goo.gl/vtKsqW


 

*माझा विशेष* : भाजप-राष्ट्रवादीचं विधीनिषेधशून्य राजकारण? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*Android/iOS App ABPLIVE*

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha