अहमदनगर : शिवसेनेनेला मतदान करण्याबाबत अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमनं मोठा दावा केला आहे. आपल्या बाजूनं मतदान करण्यायासाठी चक्क शिवसेनेकडूनच मला फोन आला होता, अशी माहिती श्रीपाद छिंदमनं दिली आहे.


श्रीपाद छिंदमनं पत्रकारांना त्या फोन कॉलची रेकॉर्डिंगही ऐकवली. या संभाषणामधील आवाज हा शिवसेनेचे महापौरपदाचे दावेदार बाळासाहेब बोराटे यांचा असून त्यांनी शिवसेनेच्या बाजूनं मतदानाची विनंती केली होती, असं छिंदमचं म्हणणं आहे.


अहमदनगर महापालिकेच्या महापौर मतदानाच्यावेळी शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचे नाव पुकारताच सर्वप्रथम हात करून छिंदमने मतदान केले. निवडणुकीदरम्यान श्रीपाद छिंदमला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.


यावरुन संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला सभागृहातच मारहाण केली. त्यानंतर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरुन शिवसेनेला बदनाम करण्यासाठी छिंदमने मत दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे


अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला आहे. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.


संबंधित बातम्या


अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी


शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी