लातूर : खासगी शिकवणी चालकांचं अपहरण करुन तब्बल 25 लाखाची खंडणी मागितल्याची घटना लातुरात उघडकीस आली आहे. व्ही. एस. पँथर्सचा संस्थापक अध्यक्ष विनोद खटके आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काँग्रेसच्या एका नगरसेवकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न देशभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या खासगी शिकवणीतून तयार होणारे अर्थकारण कायमच गुन्हेगारीला जन्म देतं. लातूर शहरात प्राध्यापक विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक राजीव तिवारी हे शिकवणी घेतात. त्यांच्याकडे दरमहा खंडणीची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.
तब्बल सहा लाख 66 हजार रुपयांची खंडणी दोघांकडून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी पुन्हा 25 लाखांची खंडणी मागत होते. ही रक्कम देण्यासाठी 10 डिसेंबर रोजी परिहार आणि तिवारींना राहत्या घरातून जबरदस्तीने पळवून नेण्यात आले, शिवीगाळ करुन जबर मारहाणही करण्यात आली. याचे सबळ पुरावे पोलिसांजवळ असल्याचेही सांगण्यात आले आहे. भयभीत झालेल्या विजयसिंह परिहार यांनी काल रात्री लातूर पोलिसात याबाबत तक्रार केली.
व्ही. एस. पँथर्सचा संस्थापक अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणारा विनोद खटके, काँग्रेस नगरसेवक पुनीत पाटील, काँग्रेस नगरसेवक सचिन म्हस्के आणि इतर चार जणांनी संगनमताने दोन्ही प्राध्यापकांकडे सातत्याने खंडणीची मागितल्याचा आरोप आहे. काँग्रेस नगरसेवक सचिन म्हस्केला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खाजगी क्लासचालकांकडून खंडणीखोरी, काँग्रेस नगरसेवकाला अटक
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
28 Dec 2018 03:59 PM (IST)
पैशासाठी शिकवणी संचालकाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या अटकेमुळे लातूरमधील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आरोपी पुनित पाटील, सचिन म्हस्के आणि विनोद खटके
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -