एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25/09/2018


1. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, जपानी कंपनीने बुलेट ट्रेनचा फंड रोखला, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा कंपनीचा सल्ला https://goo.gl/BFtzDa


2. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीस अपात्र ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, संसदेला कायदा बनवण्याचे निर्देश https://goo.gl/5TVWFF


3. ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत एसटीचा पास मोफत मिळणार, तर ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीमध्येही सवलत, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा https://goo.gl/913ke5


4. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या ताफ्यात 14 इलेक्ट्रिक कार, 90 मिनिटे चार्जिंगवर 120 किमी धावणार, महावितरण राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारणार https://goo.gl/SLEic3


5. इंधनदरवाढीची मालिका सुरुच, आज पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी महागलं, संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/wV9QYs


6. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे आमदार एकवटल्याच्या बातम्या निराधार, शरद पवारांचा दावा, उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही https://goo.gl/vdznVA


7. नारायण राणेंचे कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर, भाजपनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडूनही ऑफर असल्याचा कोळंबकरांचा दावा https://goo.gl/TDsSjt

8 . अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांची एएसबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, तीन मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा आरोप https://goo.gl/DgG8b4


9. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी दहा ओव्हरचे सामने उपयुक्त ठरतील, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमची सूचना https://goo.gl/gwVid3


10. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार रोहित शर्मासह पाच जणांना विश्रांती, तब्बल दोन वर्षांनी कर्णधारपद धोनीकडे, कॅप्टन म्हणून धोनीचा 200वा वन डे सामना https://goo.gl/94oGxw


माझा विशेष : अमित शहांसारखे अध्यक्ष सर्व राजकीय पक्षांना हवे?


एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive


एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv


एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016


@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा