एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 सप्टेंबर 2019 | सोमवार


1. निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं? राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सवाल, बालाकोटमध्ये पुन्हा अतिरेकी सक्रिय झाल्याची लष्करप्रमुखांची माहिती

2. भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता 

3. एमआयएमसोबतच्या आघाडीसाठी प्रकाश आंबेडकर आशावादी, आघाडीसाठी वंचितचे दरवाजे अद्यापही खुले असल्याचं पुण्यातील पत्रकार परिषदेत आंबेडकरांचं वक्तव्य 

4. देशातल्या सर्व कामांसाठी एकाच ओळखपत्राचा गृहमंत्री अमित शाहांचा प्रस्ताव, आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्राचा समावेश, 2021 ची जनगणना मोबाईल अॅपद्वारे करण्याचा विचार 

5. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांची काँग्रेसकडून पाठराखण, माजी पंतप्रधानमनमोहन सिंह आणि सोनिया गांधीची तिहार तुरुंगात पी. चिदंबरम यांच्याशी चर्चा 

6. मुंबईत पेट्रोलचे दर 80 च्या घरात, डिझेलही महागलं, सहा दिवसात दोन रुपयांची वाढ 

7. माहुलमधील प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा द्या, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जागा देणं शक्य नसल्यास 15 हजार रुपये घरभाडे देण्याचे आदेश 

8. बुलडाण्यातील माळेगावात आईसह चार मुलींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याचा तपास सुरु 

9. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, विधानसभेसाठी जागा न सुटल्यानं राजेंद्र गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी https://bit.ly/2my4WRN तर औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र दर्डांचा कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा https://bit.ly/2kZqk1G

10. कुस्तीपटू राहुल आवारेनं इतिहास घडवला, जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK