एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 जून 2019 | शनिवार
1. मोठ्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरी, बीडमध्ये पहिल्या पावसाचं पूजन, सोलापुरातही पावसाचं आगमन तर पाऊस लांबल्यामुळे नाशिक शहरात पाणीकपात
2. मुख्यमंत्री भाजपचाच होणार, मुंबईतील बैठकीत भाजप नेत्यांचा सूर, युती असूनही 288 जागांवर बूथची बांधणी करण्याचे महाराष्ट्र प्रभारींचे निर्देश
3. शब्द पाळला नाही तर आघाडीत आणि आपल्यात फरक काय, पीक विम्यावरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला, बँकांनाही सूचक इशारा
4. महाराष्ट्रात MBBS च्या 970 जागा वाढल्या, देशभरात 4465 जागा वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता
5. नांदेड पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकरला अखेर बेड्या, भरतीसाठी उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप
6. चेक बाऊन्स प्रकरणात अभिजीत बिचुकलेला दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर, मात्र 2012 च्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी
7. प्रेमाची कबुली देण्यासाठी अल्पवयीन मुलीला स्वच्छतागृहात डांबलं, हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमधला धक्कादायक प्रकार, आरोपी फरार
8. संमगनेरमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन लांबवलं, 17 लाख चोरले, तर पुण्यातही एटीएम न फुटल्यानं चोरांनी मशीनच पळवलं
9. सचिन तेंडुलकरला मुंबई महापालिकेकडून जाहीर झालेला नागरी सत्कार रद्द, 10 वर्षांपासून सचिनने कोणताही प्रतिसाद न दिल्याने प्रस्ताव रद्द करण्याची पालिकेवर नामुष्की
10. ऑक्टोबरपर्यंत दहशतवादविरोधी कारवाई करा, FATF चे पाकिस्तानला आदेश, तुर्की, मलेशिया, चीनमुळे पाकिस्तान ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचलं
*माझा कट्टा* : मधू मंगेश कर्णिक आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK