एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 फेब्रुवारी 2019 | शनिवार

  1. भारतमातेचे वीरपूत्र शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दणाणला https://goo.gl/RwHpGn


 

  1. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेळ, ठिकाण आणि शिक्षा आम्ही ठरवणार, यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकला पुन्हा इशारा, तर मोदींकडून महाराष्ट्रातील विकास कामांचं लोकार्पण https://goo.gl/Nk7Xp6


 

  1. पुलवामा आणि अवंतीपुरा येथून एक डझनहून अधिक संशयित तरुण ताब्यात, जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांचा शोध सुरु, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई https://goo.gl/8abtij


 

  1. पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली 'वंदे भारत एक्स्प्रेस' पहिल्याच प्रवासात खोळंबली, म्हशीने धडक दिल्याने ट्रेनचा खोळंबा https://goo.gl/R9GNVE


 

  1. मुंबईतील नालासोपाऱ्यात रेलरोको आंदोलन हटवण्यात पोलिसांना यश, पुलवामा हल्ल्याचा निषेधार्थ पश्चिम रेल्वे रोखली, तब्बल चार तास लोकल सेवेचा खोळंबा https://goo.gl/H8Jv8R


 

  1. पाकिस्तानात कार्यक्रम स्वीकारलाच कसा? दौरा रद्द केल्या प्रकरणी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांना अभिनेत्री कंगना रनौतचा सवाल, तर देशद्रोही असल्याचंही वक्तव्य https://goo.gl/Ugk5vR


 

  1. पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक शहीदांच्या कुटुंबीयांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून 5 लाख रुपये जाहीर https://goo.gl/3jZFQz


 

  1. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरचं वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंना भोवलं, द कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी , सिद्धूच्या जागी अर्चना पुरण सिंगची एन्ट्री https://goo.gl/7qKxAL


 

  1. शिवसेना-भाजप युतीवर जवळपास शिक्कामोर्तब, विश्वसनीय सूत्रांची माहिती, विधानसभेसाठी50-50 चा फॉर्म्युला भाजपला मान्य, पालघरची जागा भाजपने सेनेसाठी सोडल्याचंही वृत्त https://goo.gl/iNP9V2


 

  1. फैझ फझलच्या विदर्भानं लागोपाठ दुसऱ्या वर्षी इराणी करंडकावर नाव कोरलं, शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात, इनामाची सगळी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या निधीला समर्पित https://goo.gl/QEo1gZ


 

*विशेष मुलाखत* : एअर चीफ मार्शल (नि.) अनिल टिपणीस यांची मुलाखत, पाहा आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK