नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मोदींच्या हस्ते यवतमाळसह धुळ्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींसह केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते.
मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, "देशाच्या प्रगतीसाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात भारताचे आतोनात नुकसान झाले आहे. सर्व भारतीयांना त्याचे दुःख आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रानेदेखील त्यांचे दोन वीर जवान गमावले आहेत. शहीदांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही."
मोदी म्हणाले की, "ज्यांनी भारतावर हा भ्याड हल्ला केला, ते कुठेही लपले तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. भारतीय सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफ जवानांच्या रागाने परिसिमा गाठली आहे. मी त्यांची भावना समजतो. त्यामुळेच सरकारने जवानांना संपूर्ण मोकळीक दिली आहे.