*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*

  1. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला, ऑफिसला मात्र टाळं, कामकाज अजूनही सुरु नाही, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत https://bit.ly/2OkhFl4


 

  1. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं राज्यपालांनी संचालन करावं, देवेंद्र फडणवीस यांची विनंती, शिवसेना-राष्ट्रवादीकडूनही मुख्य सचिवांना निवेदन https://bit.ly/2QoJcEK


 

  1. शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच मदत मिळेल, सांगलीतील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरेंचं आश्वासन, शेतकऱ्यांच्या अडचणी लेखी स्वरुपात पाठवण्याचीही केंद्र प्रमुखांना सूचना https://bit.ly/33Qk2mf


 

  1. भाजपशिवाय सत्ता अशक्य, देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, तर राफेलप्रकरणी राहुल गांधीविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन https://bit.ly/2pkKyFn


 

  1. तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्ष टिकेल, विदर्भातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना विश्वास, देवेंद्र फडणवीस ज्योतिषी होते हे माहित नव्हतं, ‘मी पुन्हा येईन’वरुन टोला https://bit.ly/2CN6A6U


 

  1. पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद, शिवसेनेने प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, तर महाशिवआघाडीचे नेते उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणार https://bit.ly/2qhMuPl


 

  1. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य आपण रोज सकाळी टीव्हीवर पाहतोय, भाजप नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला https://bit.ly/3544HyD


 

  1. #पुन्हानिवडणूक? मराठी कलाकारांच्या ट्वीटवरुन वाद, अनैतिकता पसरवण्यासाठी भाजप कलाकारांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप, मात्र हॅशटॅग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचं समोर https://bit.ly/33O2XcE


 

  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची राज यांची माहिती https://bit.ly/33PXnX7


 

  1. बांगलादेशविरोधात सलामीवीर मयांक अगरवालचं दमदार द्विशतक, इंदूर कसोटीत टीम इंडियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल https://bit.ly/2KoVgC6


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK