एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 14 डिसेंबर 2018 |शुक्रवार

  1. राफेल करारात घोटाळाच नाही, सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दिलासा https://goo.gl/TZ5A4d तर राफेल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी ही दोनच नावं समोर येतील, राहुल गांधींचा घणाघात https://goo.gl/NJA4eQ


 

  1. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत, सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद, तर कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी https://goo.gl/XDK23X


 

  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन, 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल नाही, उच्च न्यायालयानंही सीबीआयला सुनावलं https://goo.gl/nTiBcR


 

  1. मेगा भरतीत मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी'साठी पर्यायच नाही, 16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा, फॉर्म भरताना विद्यार्थी बुचकळ्यात https://goo.gl/PA6kFY


 

  1. एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या https://goo.gl/3y99ho


 

  1. सोलापूर जिल्ह्यातील 'उजनी' धरणाचं पाणी आरोग्यासाठी धोकादायक, पाणी प्यायल्याने कॅन्सरची शक्यता, सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष https://goo.gl/HYhX4S


 

  1. मुंबईतील कोस्टल रोडवरुन शिवसेना-मनसे आमनेसामने, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होणार, विरोध करणाऱ्या कोळी बांधवांच्या वतीने राज ठाकरे मैदानात https://goo.gl/Gvm66o


 

  1. मुंबईत रस्सीखेच खेळताना सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, दोर मानेवर घेऊन जोर लावल्याने खाली कोसळून 22 वर्षीय जिबीनचा मृत्यू https://goo.gl/7EmTmH


 

  1. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अफवा, प्रकृती ठणठणीत असल्याचं लतादीदींचं ट्वीट, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/Gko7qR


 

  1. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 277 धावा; हॅरिस आणि फिन्चच्या शतकी सलामीनंतरही भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना रोखलं https://goo.gl/54Axqu


 

एबीपी माझा आयोजित #ब्लॉगमाझा 2018 स्पर्धेचा निकाल https://goo.gl/kwf63c

माझा विशेष : राफेलमध्ये राहुल गांधी फेल, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE

'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. http://www.majhawhatsapp.com