एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 जुलै 2019 | रविवार
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2019 06:53 PM (IST)
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीमेचे काऊंटडाऊन सुरू, भारतीय बनावटीचं चंद्रयान-2 उड्डाणासाठी सज्ज, श्रीहरीकोट्यातून मध्यरात्री सव्वादोन वाजता प्रक्षेपण 2. राज्यात 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुका, तर सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा अंदाज 3. 30 जुलैनंतर मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची माहिती, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार 4. विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गर्दीचा फटका, पूजेदरम्यानच्या उपस्थितांसाठी नियमावली बनणार 5. विधानसभेसाठी एमआयएम शंभर जागांसाठी आग्रही, प्रकाश आंबेडकरांना पत्र, नांदेड, औरंगाबाद, मुंबई आणि ठाण्यातल्या जागांवर दावा 6. अमरावती शिवसेनेतील वाद उफाळला, लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळांविरोधात काम केल्याच्या तक्रारीनंतर अनंतराव गुढे यांना मातोश्रीवरुन बोलावणे 7. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आघाडी सरकारचा असेल, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विश्वास 8. मुंबईत आता कचऱ्यावरही कर लागण्याची शक्यता, स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेचे मानांकन घसरल्याने कर विचाराधीन, विरोधकांचा मात्र आक्षेप 9. सोशल मीडियावर महिला अँकरला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या विकृताला बेड्या, मुंबई पोलिसांची पश्चिम बंगालमध्ये कारवाई 10. पंजाब काँग्रेसमधील नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद, नवज्योत सिंह सिद्धूंचा मंत्रीपदाचा राजीनामा यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK