ट्रेंडिंग
आजचा शनिवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने होईल धनलाभ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
हैदराबादविरुद्ध बंगळुरूचा लाजिरवाणा पराभव! गुणतालिकेत मोठी उलटफेर, बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर घसरली अन्...
9 वर्षीय मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
RCB vs SRH IPL 2025 : फिल साल्टचे वादळी अर्धशतक पाण्यात... सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर धमाकेदार विजय
डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टानं दिला मोठा धक्का, हार्वर्ड विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरील बंदीच्या निर्णयाला ब्रेक
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले, गंभीर लक्षणे नाहीत, घरीच उपचार सुरु
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
Continues below advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
- औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, अनेक दुकानं जाळली, वाहनांचंही मोठं नुकसान, दोघांचा मृत्यू, परिस्थिती नियंत्रणात, शहरात तणावपूर्ण शांतता https://goo.gl/d1VD6t
- औरंगाबादमधील तणावानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात, खासदार चंद्रकांत खैरेंचं पोलिसांवर खापर, तर सरकारमधील व्यक्तीच रान पेटवत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप https://goo.gl/GXqkrH
- कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी आज मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद, 15 मे रोजी निकाल, भाजपसह काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/X2D2xp
- शनिवार ठरला घातवार, औरंगाबाद, नांदेड, जळगावमध्ये भीषण अपघात, तीन अपघातात 25 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये वऱ्हाडींवर काळाचा घाला https://goo.gl/FyZSfH
- राज्यातील 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांची कलचाचणी, 21 टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे, शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडून आकडेवारी जाहीर https://goo.gl/nh1Vda
- तब्बल 46 आलिशान गाड्या, 276 बँक खाती आणि 124 मालमत्ता, डीएसकेंची संपत्ती जप्त करण्यासाठी अधिसूचना जारी https://goo.gl/Yc9b6V
- काम करताना पालघरमध्ये वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू, तासभर मृतदेह खांबावरच लटकून, वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/89eUj8
- जळगावात प्रांताधिकाऱ्याच्या घरावर वाळूमाफियांचा हल्ला, संशयित वाळू व्यावसायिक अटकेत https://goo.gl/kr6u49
- बाबासाहेब पुरंदरेंच्या पुण्यातील शिवसृष्टीला केंद्र सरकारची मदत, नितीन गडकरींच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश सुपूर्द https://goo.gl/CBLUCw
- पाकिस्तानची साखर नवी मुंबई बाजार समितीत दाखल, स्वस्त पाकिस्तानी साखरेमुळे भारतातील साखरेचे भाव पडणार http://abpmajha.abplive.in/
- प्राप्तिकर रद्द करण्याची भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची सूचना, प्राप्तिकर रद्द झाला तर देशाच्या विकास दर वाढण्याचा स्वामींचा दावा https://goo.gl/GC9N4D
- ठाण्यात ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचा पट्टा तुटला, सरकत्या जिन्यांच्या अवस्थेवरुन प्रवाशांमध्ये संताप https://goo.gl/6FRg1i
- मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कबुली, शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा बुरखा फाटला http://abpmajha.abplive.in/
- लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक, आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर, राजस्थानच्या शिक्षण विभागावर सर्व स्तरांतून टीका https://goo.gl/BkRv7t
- गायक-संगीतकार हिमेश रेशमिया दुसऱ्यांदा विवाहबंधनात, गर्लफ्रेंड सोनिया कपूरसह बांधली लग्नाची गाठ https://goo.gl/PZnqFf
Continues below advertisement