एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/04/2018


 

  1. साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला खंबाटकी घाटात भीषण अपघात, 17 मजुरांचा मृत्यू, 15 जखमी https://goo.gl/dw6bSt


 

  1. शेतकरी कर्जवाटपाची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे नाही, माहिती अधिकारात सरकारचं उत्तर, सरकारच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह https://goo.gl/3Eb2dF


 

  1. दहावीच्या पाठ्यपुस्तकालाही राजकारणाची वाळवी, राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गोडवे, चहूबाजूंनी टीकेची झोड https://goo.gl/byJNYx


 

  1. सत्ता आल्यावर भाजपला अच्छे दिन, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ, 2016-17च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक 1034 कोटींचं उत्पन्न, काँग्रेसकडे फक्त 200 कोटी, दिल्लीस्थित संस्थेचा दावा http://abpmajha.abplive.in/


 

  1. राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी होण्याची शक्यता https://goo.gl/Bz4QWR


 

  1. पिंपरी-चिंचवडसाठी नवं पोलिस आयुक्तालय मंजूर, ग्रामीण क्षेत्रातील 5 तर शहरातील 9 पोलिस स्थानकांचा समावेश, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/BDXCDd


 

  1. शिवाजी कर्डिलेंची भाजपमधून हकालपट्टी होणार नाही, मात्र शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेऊ, नगरमधील हत्याकांडप्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना मंत्र्यांची बोळवण https://goo.gl/Q5yXc2


 

  1. राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपात आणून आपले आंबे सडवू नका, पुण्यात गिरीश बापट यांची खोचक टीका, शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचाही अप्रत्यक्ष सल्ला https://goo.gl/dxpWrD


 

  1. मुंबईकरांसाठी खुशखबर, म्हाडाकडून लवकरच एक हजार घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात, यंदा गरिबांसाठी घरांची संख्या जास्त https://goo.gl/viJqyt


 

  1. आधी जोडीने श्रमदान, मग साखरपुडा, वॉटर कप स्पर्धेत नांदेडमध्ये श्रमदान करणाऱ्या महाबळेश्वरच्या नायब तहसीलदारांवर कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/Juo8Fk


 

  1. डासांची तक्रार केल्याने 'इंडिगो एअरलाईन्स'ने विमानातून उतरवलं, प्रवाशाचा आरोप, तर बेलगाम वर्तनामुळे प्रवाशाला उतरवल्याचा कंपनीचा दावा https://goo.gl/FKJ4xA


 

  1. अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पायउतार होणार, चौथ्यांदा सीईओ होणाऱ्या शर्मा वर्षअखेरीस पद सोडणार https://goo.gl/tTx9Z5


 

  1. तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीला घर सोडावं लागणार, कास्टिंग काऊचविरोधात अर्धनग्न निषेध केल्यानंतर घरमालकाची नोटीस https://goo.gl/cdwyJ1


 

  1. महाराष्ट्राची सून हीना सिद्धूचा सुवर्णवेध, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्ण, हीनाचं स्पर्धेतील दुसरं पदक https://goo.gl/btpyZ4


 

  1. मी राजीनामा देणार नाही, डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण, अमेरिकन काँग्रेससमोर झुकरबर्ग बाजू मांडणार https://goo.gl/pmWHXW


 

*BLOG* : UPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ, एबीपी माझाचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांचा ब्लॉग https://goo.gl/YnkJc4

*BLOG* : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त डॉ. संजय सोनवणे यांचा ब्लॉग, होमिओपॅथीचे जनक (ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन) https://goo.gl/vB4eAW

*विशेष चर्चा* : दहावीच्या अभ्यासक्रमात राजकीय धडे कशाला? पाहा विशेष चर्चा आज रात्री 8.30 वाजता फक्त एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*