एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
1. गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी 25 ऐतिहासिक स्थळं भाडेतत्वावर देणार
2. चांद्रयान 2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, मध्यरात्री चंद्रयानाचं लँडिंग, मोदींसह देशातील निवडक लहान मुलं सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्त्रो सेंटरमध्ये
3. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार, प्रकाश आंबेडकरांनी आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिल्याने एमआयएमचा निर्णय
4. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी मंत्री गणेश नाईक 9 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
5. राजू शेट्टी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल, कडकनाथ घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी, मनी लाँडरिंग झाल्याचाही आरोप
6. मराठवाडा वगळता सर्वत्र पावसाचा जोर, कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत वाढ, NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना, तर धुळ्यातील अमरावती आणि भोगावती नद्या 13 वर्षांनंतर प्रवाहित
7. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 1300 विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन, 2017 साली निकाल लागूनही नियुक्ती न झाल्यानं विद्यार्थी आक्रमक
8. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू, सहाही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश
9. आर्य हे भारतीयच असल्याचं संशोधन, हरियाणातील राखीगडीत मानवी सांगड्यातून मिळाला डीएनए, आर्य आक्रमणाचा सिद्धांत मोडीत
10. अजय देवगण लालबागच्या राजाच्या चरणी तर केदार जाधवकडून सहकुटुंब पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK