एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जानेवारी 2020 | सोमवार
एबीपी माझा, वेब टीम | 06 Jan 2020 06:26 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जानेवारी 2020 | सोमवार 1.दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला निकाल, अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/2FpzSK1 2. जेएनयूतील हल्ल्यानं 26/11 ची आठवण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका, तर विद्यार्थी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन, आमदार रोहित पवार गेट वेवरील आंदोलनात सहभागी https://bit.ly/2Qrds1q 3.लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपची बाजी, जालन्यात मात्र माघार, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता https://bit.ly/36v5SrY 4.पुणे सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस, महामार्गाचं काम वर्षानुवर्षे रखडल्यानं निर्णय https://bit.ly/2Qs0kJh 5.अमरावतीत प्रेमप्रकरणातून तरुणाने विद्यार्थीनीला भोसकले, हत्येनंतर स्वतःवरही केले चाकूचे वार, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू https://bit.ly/39SKFKW 6.कोल्हापुरात मटण विक्री बेमुदत बंद, कृती समिती दर कमी करण्यावर अडून बसल्यानं मटण विक्रेत्यांचा निर्णय, मटण व्यावसायिकांचा मार्केटमध्ये ठिय्या https://bit.ly/2uqa3rf 7.नागपुरातील नामांकित शाळेचा बस ड्रायव्हर होता वॉन्टेड गुन्हेगार , पोलिसांपासून लपण्यासाठी बनला स्कूल बस ड्रायव्हर, पोलिसांनी मुसक्या आवळल्या https://bit.ly/2N0JBdX 8.मातोश्रीबाहेर ताब्यात घेतलेल्या आंदोलक शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडून दखल, महेंद्र देशमुखांना दादा भुसेंचं बोलावणं, तहसीलदारांसह बँक अधिकारीही बैठकीला, सकाळीही तहसील कार्यालयात आंदोलन https://bit.ly/36u3mlY 9. मराठीच हवी...! इंग्रजीत कागदपत्रे सादर केल्याने मुंबईत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचा संताप, अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फाडून फेकली https://bit.ly/2FqsLkE 10.महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक निकाल, गतविजेत्यासह उपविजेत्याचं आव्हान संपुष्टात, बाला रफिक शेख आणि अभिजीत कटके स्पर्धेबाहेर, सोलापूरच्या माऊली जमदाडेची बालावर मात, तर हर्षवर्धन सदगीरकडून अभिजीत चितपट https://bit.ly/2QtIWUL यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK