एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 ऑगस्ट 2019 | मंगळवार
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2019 07:12 PM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 ऑगस्ट 2019 | मंगळवार 1. मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर, सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडमध्ये जमावबंदी तर साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी 2. कलम 370 हटवण्यावर लोकसभेत चर्चा सुरु, आम्ही जेव्हा जम्मू-काश्मीर म्हणतो तेव्हा त्यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश असतो, लोकसभेत निवेदन करताना अमित शाहांची स्पष्टोक्ती 3. एकतर्फी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरला तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं, याचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवर होणार, कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधींचं वक्तव्य 4. मुंबईच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची अरेरावी, महापौरांचा निषेध करणाऱ्या महिलेचा हात पिरगळला 5. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात, पहिल्याच दिवशी 'शिवस्वराज्य' यात्रेत गटबाजीचं राजकारण असल्याचं चित्र 6. डॉक्टर त्यांच्या सहकाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीने पाहत नाहीत, मग रुग्णांकडे कसं पाहत असतील? पायल तडवी आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल 7. मन की बातमध्ये मोदींनी कौतुक केलेल्या हॉटेलमालकाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन, भूसंपादनाचा तुटपुंजा मोबदला मिळाल्याने व्यथित होऊन टोकाचं पाऊल 8. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सिनेमा, अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत 9. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा धावली, तरीही वसई कोर्टाकडून रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता, ऐन गर्दीत रेल्वे प्लॅटफॉर्मवर धावणाऱ्या रिक्षाचं व्हायरल सत्य 10. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानापाठोपाठ 362 चौरस मीटरचा आणखी एक भूखंड आंदण, महापालिका सुधार समितीचं शिक्कामोर्तब ब्लॉग - 'मतयात्रांचा' हंगाम! कोणाला हवाय आशीर्वाद, तर कोणाला जनादेश, राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंचा ब्लॉग https://bit.ly/31oas8q यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK