1. चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, 11 जणांचे मृतदेह सापडले, 20 तास उलटल्यानंतरही 13 जण बेपत्ताच http://bit.ly/2XqgWGs जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका http://bit.ly/2XkETKo


 

  1. तिवरे धरणफुटी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचं अधिकाऱ्यांकडे बोट, तर शिवसेना आमदारच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी http://bit.ly/2JklxjD


 

  1. राहुल गांधींकडून काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा, ट्विटरवर प्रोफाईलही बदललं, नव्या अध्यक्षासाठी लवकर निवडणूक घेण्याचं आवाहन http://bit.ly/2LyW2Os


 

  1. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या वाट्याला काँग्रेस अध्यक्षपद मिळण्याची चिन्हं, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या नावाची चर्चा http://bit.ly/2XoPsAV


 

  1. मध्य रेल्वेचा मूर्खपणा मुंबईकरांच्या जीवावर, रविवारचं वेळापत्रक बुधवारी लागू केल्यानं प्रवाशांना मनस्ताप, मोठ्या गर्दीमुळे दुपारी वेळापत्रक मागे http://bit.ly/2NtHUZ8


 

  1. शिवनेरी बसच्या तिकीटात 80 ते 120 रुपयांनी कपात, ओला-उबर टॅक्सीचा प्रवासीसंख्येवर परिणाम होत असल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा निर्णय http://bit.ly/2XKuLij


 

  1. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मराठीसह सहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार, निकाल सर्वाधिक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी निर्णय http://bit.ly/2JlPX55


 

  1. तुकोबांच्या पालखीला काटेवाडीत धोतराच्या पायघड्या आणि मेंढ्यांचं रिंगण, पालखी सोहळ्याचं पवार कुटुंबीयांकडून स्वागत, माऊलींची पालखी तरडगाव मुक्कामी


 

  1. विश्वचषकातून डावललेल्या अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; आईसलँड क्रिकेटने दिलेल्या नागरिकत्वाच्या ऑफरने अधिकच खळबळ http://bit.ly/306Ieyv


 

10. फलंदाजी आणि यष्टिरक्षणाप्रमाणेच निवृत्तीची योग्य वेळही मला माहित आहे, निवृत्तीच्या सूचना देणाऱ्या ट्रोलर्सना महेंद्र सिंह धोनीचं सूचक उत्तर http://bit.ly/2Xpij8x