एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/09/2017

  1. एलफिन्स्टन आणि परेल स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीत 22 मुंबईकरांचा बळी, लोकलच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी दुर्घटना https://goo.gl/M7HL2T


 

  1. पावसाची सर आली, पत्रा कोसळल्याची अफवा पसरली, धावपळीनंतर चेंगराचेंगरी झाली, एलफिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? https://goo.gl/XrWGME


 

  1. रेल्वेमंत्र्यांच्या पहिल्याच मुंबई दौऱ्यात भीषण दुर्घटना, पियुष गोयल यांचे नियोजित कार्यक्रम रद्द, चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश https://goo.gl/5cKnSN


 

  1. केवळ फंड नसल्याने पुलाच्या रुंदीकरणाचं काम रखडवलं, शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप http://abpmajha.abplive.in/


 

  1. मुंबईतील दुर्घटनेवर राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, तर मुंबईकरांचा सरकारवर संताप, शिवसेनेचीही भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी https://goo.gl/5cKnSN


 

  1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार आणि रेल्वेकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार https://goo.gl/5cKnSN


 

  1. बुलेट ट्रेनपेक्षा आधी आहे ते जपा, एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका, रेल्वेच्या कारभारावरही प्रश्न http://abpmajha.abplive.in/


 

  1. मुख्यमंत्रिपदाची आशा बाळगणाऱ्या चंद्रकांतदादांना शुभेच्छा, पण खडसेंचं काय झालं ते विसरु नका, शिवसेनेचा ‘सामना’तून टोला, अमित शाहांमुळेच पाटलांना महसूल मंत्रीपद मिळाल्याचा उल्लेख https://goo.gl/t4bZ9C


 

  1. नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्याक समुदायाच्या सवलती, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुमारे 50 लाख नवबौद्ध नागरिकांना फायदा https://goo.gl/UeiZzf


 

  1. पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा यंदा बीडच्या सावरगाव घाटात, गडाऐवजी भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु करणार https://goo.gl/ecYbLL


 

  1. मिस्ड कॉल द्या, तुमच्या पीएफची रक्कम जाणून घ्या; मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर काय करायचं? पाच सोप्या टिप्स https://goo.gl/5wBHsw


 

  1. 25 रुपयांचा पार्ले जी, पार्ले कंपनीला 35 हजार रुपयांचा फटका, बिस्किटांच्या पुड्यात किडे आढळल्याने कंपनीला ग्राहक कोर्टाचा दणका https://goo.gl/3bSHbD


 

  1. मुंबईत उबर टॅक्सी चालकाकडून तरुणीची छेडछाड, आरोपी चालक पसार, वांद्रे पोलिसांकडून शोध सुरु https://goo.gl/V4mqSb


 

  1. उद्यापासून सलग तीन दिवस बँकांना सुट्टी; दसरा, रविवार आणि गांधी जयंतीमुळे बँका बंद, मंगळवारी बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता https://goo.gl/fs6bv4


 


15 दसऱ्याआधी झेंडूच्या फुलांची मोठी आवक, खरेदीसाठी बाजापेठा फुलल्या, फुलांचे दर 100 ते 150 रुपये किलोवर http://abpmajha.abplive.in/

माझा विशेष : मुंबईकरांचं मरण एवढं स्वस्त का?, विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

ब्लॉग: कविता ननवरे यांचा ब्लॉग - ओ नौ रंग मे रंगनेवाली...! https://goo.gl/FdEYQC

ब्लॉग:  जिभेचे चोचले : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे https://goo.gl/JY2rUR

मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, बुलडाण्यातील नवदुर्गा, पाहा उद्या सकाळी 6.40 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर