एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 ऑगस्ट 2019 | गुरुवार

1. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी, वकील आणि परिवाराला दररोज केवळ अर्धा तास भेटण्याची परवानगी 

2. पाच तासांपासून राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी सुरु, कारवाईवरून काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा https://bit.ly/2KMxYGM मनसे कार्यकर्त्यांची धरपकड https://bit.ly/2HllfZy

3. परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल 

4. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अडचणीत, 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी हायकोर्टाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश 

5. औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी, आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा 418 मतांनी पराभव 

6. नागपूरच्या हसनबाग, दिघोरी घाट आणि गोंडवानामध्ये एकाच रात्रीत तीन हत्या, एकाला अटक, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

7. माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंना दिलेला 'भारतरत्न' काढून घेण्याची मागणी करणारी याचिका 'अर्थहीन', मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला 50 हजारांचा दंड ठोठावला 

8. मुख्यमंत्री फडणवीस, आदित्य ठाकरेंनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची यात्रा, 23 ऑगस्टपासून सुप्रिया यांचा राज्यव्यापी संवाद दौरा 

9. जेलरोडपाठोपाठ नाशिकच्या मखमलाबादमध्येही SBI एटीएमवर दरोडा, लाखो रुपये लंपास, पोलिसांकडून तपास सुरु 

10. अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार, 2700 चौरस किमी क्षेत्र प्रभावित 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK