एबीपी माझाच्या असंख्य प्रेक्षक आणि वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 सप्टेंबर 2019 | सोमवार

1. मावळा राजेंचं मन वळवू शकत नाही, साताऱ्यात उदयनराजे भोसलेंसोबतच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हेंची सूचक प्रतिक्रिया, उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना बळ 

2. पुढच्या वर्षीही वर्षा बंगल्यावरच बाप्पांचं स्वागत करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास 

3. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, अजित पवारांसह 70 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ 

4. आमच्यावरचं ईडीचं संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करेल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना विश्वास

5. काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश 

6. कुलभूषण जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस, भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांची जाधव यांच्यासोबत अडीच तास बातचित 

7. मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा घरोघरी विराजमान, ठिकठिकाणी बाप्पाच्या सजावटीची हटके स्टाईल 

8. मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींची बाप्पाला आरास, नाना पाटेकर, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉयच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत 

9. सुरक्षा व्यवस्थांना भेदून संसदेत शिरण्याचा तरुणाचा प्रयत्न, चाकूसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरु 

10. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाची मजबूत पकड, विजयासाठी भारताला 8 विकेट्सची तर विंडीजला 423 धावांची गरज 

'एबीपी माझा'ची 'बाप्पा माझा' स्पर्धा... स्पर्धेत कसा सहभाग घ्याल? 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK