1. राजकीय भवितव्याच्या चिंतेमुळे लोक रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, आम्ही कोणाच्याही दारात जात नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना टोला 


2. पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल, शारीरिक चाचणी परीक्षेतील निकष शिथिल, 100 ऐवजी 50 गुणांची परीक्षा होणार 

3. नागपुरात शालेय पोषण आहारात अळ्या तर गोंदियात वटवाघळाच मृत पिल्लू, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ 

4. कोल्हापुरच्या अंबाबाईची मूर्ती बदलण्याच्या हालचालींना सुरुवात, आत्ताची मूर्ती भग्न झाल्याने नवी मूर्ती बसवण्याची शक्यता 

5. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2XT3BGO तर उत्तर प्रदेशात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याची राहुल गांधींचा आरोप 

6. कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निणर्यानंतर पाकिस्तानची भूमिका मवाळ, जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटू देण्यास पाकिस्तान तयार 

7. चांद-तारा असलेल्या हिरव्या झेंड्यावर बंदीची मागणी, शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका 

8. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा, शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता https://bit.ly/30LmwAD

9. पुणे महापालिकेच्या नवीन कक्षातील वास्तुदोष दूर करण्यासाठी नुतनीकरण, पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी 

10. अलिबागवरुन आलास का? या डायलॉगवर बंदी नाही, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK