- अयोध्या प्रकरणी मध्यस्थ समितीचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात, पुढील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी, 1 ऑगस्टपर्यंत मध्यस्थ समितीला अंतिम अहवाल देण्याचे आदेश https://bit.ly/30GeiJI
- पदासाठी नाही, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आशीर्वाद हवा, जळगावमध्ये जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न https://bit.ly/2LqzmR1
- शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नसल्याचा चंद्रकांत पाटलांचा सोलापुरात दावा, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार याच आठवड्यात राजीनामा देणार असल्याचाही गौप्यस्फोट https://bit.ly/2YYTcG3
- अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, सर्वसहमतीने नाव शोधण्यात अपयश आल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक हाच मार्ग उपलब्ध https://bit.ly/2JDU1iE
- मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांचा सहभाग? चौकशीत नाव आल्याची पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची माहिती https://bit.ly/2LZhAnE
- लहान मुलांच्या वादातून परभणीतील पालम शहर पेटलं, दोन गटातील वादात दुकानांचं मोठं नुकसान, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता https://bit.ly/2JCleSH
- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला बेड्या, दुबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना क्राईम ब्रांचची कारवाई https://bit.ly/30GjNbk
- चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला, येत्या 22 जुलैला दुपार 2.43 मिनिटांनी प्रक्षेपण होणार, 15 जुलैचं उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे झालं होतं रद्द https://bit.ly/2xVS9e8
- केंद्र सरकारकडून टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याची शक्यता, देशविरोधी कारवायांमध्ये टिकटॉकचा सहभाग असल्याचा सरकारला संशय https://abpmajha.abplive.in/
- न्हाव्याने मिशी कापली म्हणून थेट पोलिसात धाव, नागपूरच्या कन्हानमधील प्रकार, अजब तक्रारीने पोलिसही चक्रावले https://bit.ly/2YXiZi4
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK