*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17/08/2018*

 

  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिताकडून मुखाग्नी https://goo.gl/xWiWQ6


 

  1. अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोदी, शाह, फडणवीस सहभागी, भाजप मुख्यालय ते राष्ट्रीय स्मृती स्थल 5 किमी पायी प्रवास, अटलजींना निरोप देण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी https://goo.gl/6VUQgB


 

  1. वाजपेयींना अखेरचा निरोप देण्यासाठी विदेशी पाहुण्यांची हजेरी, भूतानचे राजे, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष, नेपाळचे परराष्ट्र मंत्र्यांसह श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानचे प्रतिनिधी अंत्यविधीला उपस्थित https://goo.gl/xWiWQ6


 

  1. औरंगाबाद महापालिकेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास एमआयएम नगरसेवकाचा विरोध, भाजप नगरसेवकांकडून सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम चोप https://goo.gl/BZXf3W


 

  1. 5. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती https://goo.gl/auU3P6


 

  1. 6. केरळमध्ये तुफान पावसाने जलप्रलय, पुरामुळे मृतांचा आकडा 167 वर, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, परिस्थितीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी केरळला जाणार https://goo.gl/cfwhZH


 

  1. नंदुरबारला पावसाचा तडाखा, नवापूर तालुक्यातील सरपणी, रंगावली नदीला पूर, तिघांचा मृत्यू तर 300 घरांची पडझड, जनावरंही दगावली https://goo.gl/CYfKe9


 

  1. पेंग्विनच्या पिल्लाचा पायगुण, भायखळ्यातील राणीच्या बागेच्या विकासाचा मार्ग मोकळा, मफतलाल कंपनीच्या ताब्यातील भूखंड महापालिकेच्या ताब्यात देण्याचा हायकोर्टाचा आदेश https://goo.gl/FQrtPp


 

  1. पुण्यातील फ्लॅटसाठी भाडेकरु न मिळाल्याने सचिन तेंडुलकरला टॅक्समध्ये सूट, आयकर अपीलेट लवादाचा 3 लाखांचा कर न घेण्याचा निर्णय https://goo.gl/8TqLk8


 

  1. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर नासिर जमशेदवर दहा वर्षांची बंदी, भ्रष्टाचार विरोधी नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याने पीसीबीची कारवाई https://goo.gl/E73H2r


 

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive*

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv*

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*