एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 नोव्हेंबर 2019 | रविवार


1. शिवसेना अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा, दोन्ही सभागृहात सेना खासदार विरोधी बाकांवर बसणार, भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता https://bit.ly/32SVS9E

2. भाजपपेक्षा शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, जयंत पाटलांचं वक्तव्य, पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित, तर उद्या पवार-सोनिया भेटीची शक्यता https://bit.ly/2KtD1eQ

3. देवेंद्र फडणवीसांकडून शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन, फडणवीसांसमोर शिवसैनिकांची ‘मी पुन्हा येणार’ अशी घोषणाबाजी https://bit.ly/32V0k7I

4. उद्धव ठाकरेंसह परिवाराकडून बाळासाहेबांना अभिवादन, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही हजेरी, राज्यभरातून कार्यकर्तेही शिवतीर्थावर https://bit.ly/2putIEc

5. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही 'वर्षा' बंगल्यातच; तीन महिन्यांची वाढवली मुदत https://bit.ly/33Vbz19

6. आम्हाला कुणीही शहाणपण शिकवू नये, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला संजय राऊतांचं उत्तर, तर उद्धव यांचा निरोप घेऊन राऊत काँग्रेस नेत्यांना भेटणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/37dgpJq

7. अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2XnKEJ0

8. उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु,मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं दुसरं अधिवेशन, वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष https://bit.ly/2r02Ax8

9. कोल्हापूरच्या इचलकरंजीत बलून गॅस टाकीचा मोठा स्फोट, गंभीर जखमी झालेल्या 15 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, पालकांनी काळजी घेण्याची नितांत गरज https://bit.ly/377pHXj

10. नागपूर-अमरावती महामार्गावर पेट्रोलियम पदार्थाचा टँकर पेटला, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू, आगीच्या ज्वाळांमुळं महामार्ग काहीकाळ ठप्प https://bit.ly/2OnWejh

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK