एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 13 डिसेंबर 2018 | गुरुवार

  1. देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तीन राज्यातील पराभवानंतर मोदी सरकारकडून तब्बल 4 लाख कोटींची कर्जमाफी होण्याची शक्यता, जुमलेबाजी असल्याचा राजू शेट्टींचा आरोप https://goo.gl/Wq4UJQ


 

  1. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत तर मध्य प्रदेशात कमलनाथ, सूत्रांची माहिती, तर तेलंगणामध्ये मुख्यमंत्रीपदी पुन्हा के. चंद्रशेखर राव https://goo.gl/u9WU26


 

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस, याचिकाकर्ते खोडसाळ असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण https://goo.gl/vURjCH


 

  1. शिक्षक मेगा भरतीच्या हालचालींना वेग, येत्या जानेवारीत होणार शिक्षक भरती, लाखो डीएड, बीएड धारकांना मोठा दिलासा https://goo.gl/f9JwXN


 

  1. राज्यात मराठा जात प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात, सेतू सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी, जालना जिल्ह्यात मिळालं पहिलं प्रमाणपत्र https://goo.gl/AbNxDM


 

  1. दुष्काळ परिस्थितीत पाणी चोरी रोखण्यासाठी शासनाची कडक पावलं, नैसर्गिक जलसाठ्यातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे जलसंपदा विभागाचे निर्देश https://goo.gl/G3TTdf


 

  1. करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती भंगलेल्या अवस्थेत असल्याचा भक्तांचा दावा, मूर्ती बदलण्याची मागणी,  प्रशासनाकडे निवेदन सादर https://goo.gl/3Bfq9H


 

  1. वाळू माफियांकडून वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर, 56 गाढवं जप्त, वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठीच्या नव्या फंड्यानं अधिकारी चक्रावले https://goo.gl/1XCwYL


 

  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका, दुखापतीमुळे फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा संघातून बाहेर https://goo.gl/mX5AYb


 

  1. व्हॉट्सअॅप युजर्सना मोठ्या दिलाशाची शक्यता, यूजरच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये अॅड करता येणार नाही https://goo.gl/Ehkt3J


 


माझा विशेष : कर्जमाफीमुळे भाजप सरकार तरेल का?, पाहा विशेष चर्चा 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE

'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या  नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com