एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 12 डिसेंबर 2018 | बुधवार
1. मध्य प्रदेशात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, भाजपचा सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय, 114 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सपा आणि बसपचा पाठिंबा https://goo.gl/u9YxCB
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतची नाराजी मतांतून व्यक्त, राहुल गांधी यांची टिंगल महागात, विधानसभा निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपवर टीका https://goo.gl/bLHzuH
3. राहुल गांधी मेरीटमध्ये, नरेंद्र मोदी - अमित शाह जेमतेम काठावर पास झाल्याचा निकाल, 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपचे कान टोचले https://goo.gl/XaJhqT
4. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येण्याची चिन्हं, भाजपचे खान्देशातील मोठे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची शक्यता https://goo.gl/DR9KSV
5. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण, भाजपमधील अंतर्गत वादांमुळे काकडे नाराज https://goo.gl/1L7V7P
6. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम शिवरायांपुढेच नतमस्तक, अहमदनगर महापालिकेतील विजयानंतर छिंदमचं महापुरुषांना अभिवादन https://goo.gl/8xuHNu
7. धुळ्याच्या महापौरपदासाठी चार नगरसेवकांची नावं चर्चेत, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन नगरसेवकांची नावं अग्रस्थानी https://goo.gl/HWFdJH
8. लोणावळ्यातील प्रसिद्ध 'मगनलाल फूड प्रॉडक्ट्स'ला चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश, चिक्कीमध्ये त्रुटी आढळल्याने एफडीएची कारवाई https://goo.gl/NuhTLd
9. भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचं रक्षण करणं ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी, मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण, कुत्र्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश https://goo.gl/t9eFY4
10. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी विवाहबंधनात, आमिर खान, शाहरुख खानसह अवघ्या बॉलिवूडची लग्नाला हजेरी https://goo.gl/JWaLu5
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE
'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com