1. *एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/08/2017*

    1. शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत मंजूर, मनपा शाळेत आता आठवड्यातून दोन दिवस ‘वंदे मातरम्’चा आवाज https://gl/wejgYz 


     

    1. प्रिय पप्पा, भाऊप्रमाणे तुम्हीही आत्महत्या करु नका, वडिलांच्या आत्महत्येच्या भीतीने शेतकऱ्याच्या मुलीने जीवन संपवलं, परभणीतील घटनेने काळजाला चटका https://gl/pYNcXf


     

    1. मराठा मोर्चातून परतताना 5 जणांचा अपघाती मृत्यू, येवला-औरंगाबाद मार्गावर तिघांचा तर वडाळ्याजवळ दोघांचा दुर्दैवी अंत https://gl/C6owi5


     

    1. विधानसभा विरुद्ध विधानपरिषद आमदारांचा फुटबॉल सामना, मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री, तावडे रेफ्री, फुटबॉलला चालना देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम, पैलवानाने कुस्ती नाही, गोल मारला, महेश लांडगेंच्या गोलवर मुख्यमंत्र्यांची टिपणी https://gl/LuAJpd


     

    1. अंतिम आठवडा प्रस्तावावरुन विधीमंडळात गदारोळ, विरोधकांचा अधिकार असूनही सरकारकडून कामकाज रेटण्याचा प्रयत्न,


    खडसे, पृथ्वीराज चव्हाणांनी नियम दाखवल्याने सरकारची अडचण https://goo.gl/XUMjh9  

    1. देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना, मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचं वक्तव्य, तर भारत हा धर्मनिरपेक्षतेचा उत्तम नमुना, नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची प्रतिक्रिया  https://gl/U2z88U 


     

    1. देशात मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना होती, तर हमीद अन्सारींनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, शिवसेनेचा निशाणा https://gl/GyEbHj 


     

    1. चांगलं काम केलंत, तरच 2019 मध्ये खासदारकी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासदारांना तंबी, अमित शाह राज्यसभेत आलेत, दांडीबहाद्दरांची मौजमस्ती थांबेल, मोदींना विश्वास  https://gl/CrR7UC 


     

    1. काळ्या पैशाविरोधात आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप येवले पोलिसांच्या ताब्यात, विधीमंडळ परिसरातील आंदोलनादरम्यान कारवाई


    http://abpmajha.abplive.in/ 

    1. प्राथमिक चौकशीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलमध्ये गैरव्यवहार सापडला नाही, एसीबीची मुंबई हायकोर्टात माहिती, तथ्य आढळल्यास चौकशी करणार https://goo.gl/ZBthQ9


     

    1. फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना https://gl/PdD4Xt


     

    1. नागपुरात ‘टेक्नो’ चोरांचा सुळसुळाट, आतापर्यंत 40 एटीएममधून 50 लाख रुपये लंपास https://gl/sFWq8C तर अकोल्यात 4 चोरांनी 5 मिनिटात 5 लाख लुटले https://goo.gl/T2b8ce 


     

    1. सरकार साखर आयात करण्याच्या तयारीत, सणांच्या दिवसात सारखेचे दर वाढू नयेत म्हणून 2 ते 3 लाख टन साखर आयात करण्याचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in/


     

    1. ब्लू व्हेल गेमच्या नादात 14 वर्षीय मुलगा सोलापूरहून थेट पुण्याकडे, लोकेशनच्या आधारे पोलिसांनी भिगवणजवळ ताब्यात घेतलं, जीवघेण्या टास्कची धडपड टाळण्याचा सल्ला https://gl/p2fKxv


     

    1. वादग्रस्त स्वामी ओम यांचा नवा कारनामा, 9 वर्षापूर्वीच्या सायकल चोरीच्या खटल्यात दिल्ली पोलिसांकडून अटक


    https://goo.gl/fvcLw8  

    *माझा विशेष* -  ‘वंदे मातरम्’ मुळे असुरक्षित का वाटतंय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा @abpmajhatv वर

    *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

    *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

    *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*