एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/09/2017
1. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी 10 वाजता, विस्तारासाठी भाजपकडून शिवसेना, जेडीयूसह एकाही घटकपक्षाला अद्यापही निमंत्रण नाही, घटकपक्षांमध्ये संभ्रम https://goo.gl/abfmdi
2. संरक्षणमंत्रीपदासाठी गडकरी, प्रभू आणि सुषमा स्वराज यांचं नाव चर्चेत, ओम माथूर यांचं नावही आघाडीवर, राजधानी दिल्लीत अनेक चर्चांना उधाण http://abpmajha.abplive.in/
3. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी चक्क गुजरात, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांचे अर्ज, तर मुंबईतूनही जवळपास 14 हजार कर्जमाफीचे अर्ज, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती https://goo.gl/5ZR3tV
4. नीट परीक्षेविरोधात लढणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीची आत्महत्या, एमबीबीएससाठी प्रवेश न मिळाल्यानं टोकाचं पाऊल, अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडू पेटलं, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष रस्त्यावर goo.gl/3FU3QT
5. मुंबईच्या अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, गाड्या तब्बल 18 तास उशिरानं, मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल https://goo.gl/DgQGMP
6. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर 4 दिवसांपासून ठप्प असलेली टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक अखेर आजपासून सुरु, मध्य रेल्वेची माहिती https://goo.gl/W9Kjmy
7. ज्येष्ठ कवयित्री आणि आचार्य अत्रेंची कन्या शिरीष पै यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन, मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/DPMB7b
8. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ खासगी बसचा भीषण अपघात, अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू तर 32 जण जखमी https://goo.gl/cXqmZK
9. सेल्फीचा नाद तरुणाच्या जीवावर बेतला, 18 वर्षीय जुनेद शेखचा बीडमधील कपिलधार धबधब्यात बुडून मृत्यू https://goo.gl/T3a4y2
10. बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक, कोट्यवधींची रक्कम घेऊन मलेशियन कंपनीचे संचालक फरार http://abpmajha.abplive.in/live-tv
11. चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण गावात तब्बल 112 शौचालयं चोरीला, गावातील महिलांकडून पोलिसात तक्रार, तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचानी निधी लाटल्याचा आरोप https://goo.gl/3UWamS
12. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरु https://goo.gl/b74aym
13. जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह, मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी http://abpmajha.abplive.in/live-tv
14. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे लालबाग आणि दगडूशेठला तुफान गर्दी, तर सिद्धिविनायकाच्या चरणी 10 फुटी महामोदक, माझाचा विशेष रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv
15. स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या घरी नन्ही परी अवतरली, मुलीच्या जन्मानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच सेरेना कोर्टवर परतणार https://goo.gl/ek7r1z
माझा कट्टा : व्हॉईस आर्टिस्ट चेतन सशितल यांच्याशी नॉनस्टॉप गप्पा, आज रात्री 9.00 वाजता, @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर