एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018

  1. काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलने हल्ला, कॅप्टनसह 4 जवान शहीद, राजौरीत 3 दिवसांसाठी 84 शाळा बंद https://goo.gl/YcjJ2V, वयाच्या 23 व्या वर्षी कॅप्टन कुंडू यांना वीरमरण https://goo.gl/yydbkh



  1. छगन भुजबळांचे समर्थक राज ठाकरेंच्या भेटीला, मार्च महिन्यात मुंबईत भुजबळ समर्थकांचा मेळावा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/KWGgRc



  1. प्रहार संघटनेकडून औरंगाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला मारहाण, ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने कार्यालयाचीही तोडफोड https://goo.gl/xiTM4H



  1. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंशी फोनवरुन गुफ्तगू नाही, उद्धव ठाकरेंनी वृत्त फेटाळलं, 'सामना'तून माध्यमांवर ताशेरे https://goo.gl/yDJCQ2



  1. दहा रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना https://goo.gl/vU31ga



  1. आईला अपशब्द वापरल्याचा राग, डोंबिवलीत विद्यार्थ्याकडून ट्यूशन टीचरची हत्या, तरुणाला अटक https://goo.gl/HWv24n



  1. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अवैध मद्यविक्री, रुफटॉप हॉटेल आणि हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई https://goo.gl/TBjTKh



  1. दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात तिसऱ्या व्यक्तीला नाक खुपसण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतींचे कान उपटले https://goo.gl/xeF8Hy



  1. मुंबई विमानतळाकडून सर्वाधिक वर्दळीचा स्वतःचाच विक्रम मोडित, 20 जानेवारीला 24 तासांमध्ये 980 विमानांची ये-जा https://goo.gl/W4C5Jj



  1. बालरंगभूमी पोरकी, ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर कालवश, हृदयविकाराच्या धक्क्यामुळे वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/kj6XTH



  1. 2017 मध्ये सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं, ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून माहिती समोर https://goo.gl/pfis3W



  1. स्कूटर कारवर धडकवून गर्लफ्रेण्डच्या आईकडून अपघाताचं निमित्त, फोटोग्राफर अंकित सक्सेना हत्येप्रकरणी नवी माहिती https://goo.gl/FXPNzt



  1. आफ्रिका खंडातील नायजेरियाच्या किनाऱ्यावरुन भारतीय जहाज गायब, गुरुवारी पहाटेपासून संपर्क नाही, अपहरण झाल्याची शक्यता https://goo.gl/xfh4we



  1. संरक्षण मंत्रालयाने 'अय्यारी' चित्रपटात बदल सुचवले, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता https://goo.gl/AMBFjd



  1. आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला, अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापकाचं वक्तव्य https://goo.gl/XDw4c2


माझा विशेष : शाळा न सांभाळणाऱ्या सरकारने खाजगी क्लासेससाठी नियम बनवावेत? विशेष चर्चा आज रात्री 9 वा. एबीपी माझावर


EXCLUSIVE : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत https://goo.gl/RqNq2U

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा नवीन ब्लॉग, शोकांतिकेची गाथा... https://goo.gl/hX8yFw

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि अँकर नम्रता वागळे यांचा ब्लॉग, सॅनिटरी पॅड क्रांती गरजेची? https://goo.gl/8GT611

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा