मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 15 पानी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध असेल. त्यासाठी https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करावं लागेल.




या वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 असा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्जाचा नमुना किंवा नोंदणीसाठी पर्याय दिला जाईल.

नाव नोंदणी

कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर नोंदणी करण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन नोंदणी हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डने नोंदणी करावी लागेल. आधार कार्ड असेल, तर प्रक्रिया आणखी सुरळीत होते.

आधार क्रमांक टाकावा

आधार कार्ड नसेल तर प्रत्येक प्रक्रिया स्वतः भरून आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन आपल्याला नोंदणी प्रक्रियेसह पुढे जाणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर, कोणताही अर्ज करण्यासाठी आपल्याला संबंधित अधिकृत विभाग अधिकाऱ्यांनी पडताळणी केलेले सर्व आवश्यक दस्तऐवज मिळवावे लागतील.

आधारने नोंदणी केल्यानंतर पुढे ओटीपी जनरेट करावा लागेल, जो तुमच्या आधार कार्डशी संलग्नित मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.



शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार नोंदणीकृत असेल तर ओटीपी नोंदणीची निवड करावी. ज्यामध्ये एक-वेळचा,पिन (ओटीपी) डॉक्युमेंटमध्ये उल्लिखित ओटीपी यूआयडीएआय (प्राधिकरण) नोंदणीकृत क्रमांकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जातो. हा ओटीपी मर्यादित वेळेसाठी वैध असेल.

बायोमेट्रिक पर्याय कोणी निवडला पाहिजे ?

शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक आधार नोंदणीकृत नसल्यास बायोमेट्रिक नोंदणीची निवड करावी. आधार क्रमांक धारक, आधार क्रमांकासह बायोमेट्रिक डेटा प्रदान करतो.

ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्नित बँक अकाऊंट आपोआप दाखवलं जाईल. तुमचं अकाऊंट लिंक नसेल, तर ते तुम्हाला लिंक करावं लागेल.



पुढे अखेरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं वापराचं नाव आणि पासवर्ड तयार करावा लागेल, जो फॉर्म भरताना लॉग इन करण्यासाठी कामी येईल. पासवर्ड तयार केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी पर्याय दिसेल.



नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य पानावर जाऊन तुम्ही तयार केलेल्या पासवर्ड आणि नावाने लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कर्जचा फॉर्म दिला जाईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती भरावी लागेल.

संबंधित बातमी : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार!