एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11/08/2018

  1. नालासोपारा देशी बॉम्बप्रकरणी एटीएसचं धाडसत्र सुरुच, बारापेक्षा जास्त ताब्यात, तर तपासाच्या नावाखाली छळ होत असल्याचा सनातनचा आरोप https://goo.gl/johFti

  2. नालासोपाऱ्यातील स्फोटके मराठा मोर्चात घातपात घडवण्यासाठी होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा सनसनाटी आरोप https://goo.gl/bbNCsb

  3. औरंगाबादमधील वाळुज एमआयडीसीत मराठा आंदोलनादरम्यान तोडफोड प्रकरणी 41 जण ताब्यात, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपन्यांची पाहणी https://goo.gl/6AVTMd

  4. नवी मुंबईत सिडकोच्या 15 हजार घरांची 13 ऑगस्टला लॉटरी, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज भरता येणार https://goo.gl/96K5rt

  5. गोयल गंगा बिल्डर्सच्या पुण्यातील गंगा भाग्योदय गृहनिर्माण प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा दणका, पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 100 कोटींचा दंड https://goo.gl/AnuwUQ

  6. मोदी सरकारने जाहीर केलेला 'दीडपट' हमीभाव ही निव्वळ धूळफेक, हायकोर्टात साताऱ्यातील शेतकऱ्याची जनहित याचिका, केंद्राला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://goo.gl/CKexF1

  7. आजींच्या चोरी झालेल्या तीन तोळ्यांच्या पाटल्यांची पोलिसांकडून स्वखर्चाने भरपाई, पिंपरी चिंचवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक https://goo.gl/dMCfsU

  8. केरळमध्ये पावसाचं थैमान सुरुच, 54 हजार नागरिक बेघर, तर दरड कोसळल्यामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम, गेल्या 50 वर्षातील पहिलाच हाहाःकार https://goo.gl/3rqNqZ

  9. देशातलं पहिलं महिला SWAT पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत, महिला कमांडो पुरुष पथकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार https://goo.gl/cA6f4B

  10. 'लॉर्ड्स'मध्ये भारताचा पहिला डाव 107 धावांवर आटोपल्यानंतर आता गोलंदाजांची कसोटी, इंग्लंडचे चार फलंदाज माघारी, लवकरात लवकर रोखण्याचं आव्हान https://abpmajha.abplive.in/


माझा कट्टा : आयुष्यभराच्या साधनेची राख होऊनही पुन्हा नव्या उमेदीने उभे राहणारे शिल्पकार माझा कट्टयावर, प्रमोद कांबळेंचा प्रेरणादायी संघर्ष, आज रात्री 9 वाजता


एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा