एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षक आणि वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!


1. आषाढीनिमित्त पंढरीत भक्तीचा सोहळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा, तर सिंदखेड राजा तालुक्यातील मेरठ दाम्पत्याला पुजेचा मान https://goo.gl/Q1Qi8g ‘शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करण्याची शक्ती दे’, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं https://goo.gl/JFzkHt

2. जुन्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी का नाही? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल, परभणीतील शेतकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी https://goo.gl/csyZjX

3. राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर https://goo.gl/psjZPY कर्जमाफीत मुंबईतल्या 813 शेतकऱ्यांचा समावेश, मुख्यमंत्रीही चक्रावले, चौकशीनंतरच कर्जमाफी करणार असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/aUzYnJ

4. भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्येंच्या मृत्यूची कारणं सांगणारा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती, अनेक गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर http://abpmajha.abplive.in/live-tv

5.  मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘एल्फिन्स्टन रोड’ स्टेशनचं नवं नाव ‘प्रभादेवी’, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या प्रस्तावाला रेल्वेची अखेर मंजुरी https://goo.gl/9xDTJ9

6. मुंबईत लोकलखाली उडी मारूनही महिला सुखरूप, घाटकोपर रेल्वे स्थानकावरची घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/yehH3s

7. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर, 26/11 च्या हल्ल्यातून बचावलेल्या चिमुरड्याला मोदी भेटणार https://goo.gl/iq9CT4

8. हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, अतिरिक्त युद्धनौका तैनात, पंतप्रधान मोदींच्या भारत-अमेरिका भेटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती https://goo.gl/mjGCTe

9.  गडचिरोलीतील भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडेवर बलात्काराचा गुन्हा, बसमधील लैंगिक चाळ्याची क्लिप व्हायरल झाल्यानं प्रकरण उजेडात, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप https://goo.gl/RcNeQB

10. बर्थडे पार्टीत 17 वर्षीय विद्यार्थिनीवर चार मित्रांचा गँगरेप, तेलंगणातील धक्कादायक घटना, चौघांवर 'पोस्को' अंतर्गत गुन्हा दाखल https://goo.gl/NUR8tf

11. वडिलांवर गुन्हा दाखल करायला गृहराज्यमंत्र्यांना मुहूर्त मिळेना, शिपाई मारहाणप्रकरणी तीन दिवसानंतरही पोलिसांचे हातावर हात https://goo.gl/YFB5Ri

12. सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/4Um1KR

13.  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा फैसला 21 जुलैला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून घरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता https://goo.gl/NtQtwy

14. जीएसटीनंतर वस्तूंवर जुनी आणि नवी किंमत दाखवणं अनिवार्य, सरकारचे स्पष्ट शब्दात आदेश https://goo.gl/r34eRM

15. महापालिका आणि सिडकोच्या वादात पनवलेमध्ये ‘कचराकोंडी’, अनेक भागात कचऱ्याचं साम्राज्य, दुर्गंधीने नागरिकांचं आरोग्य धोक्यात https://goo.gl/MGipJM

IBPS RRB Office Assistant 2017: बँकांमध्ये 14 हजार पदांसाठी भरती https://goo.gl/uMnrU3

माझा विशेष - मुंबईत 813 शेतकरी कुठून आलेत?

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर