1. मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळात दाखल, हवामान विभागाची माहिती, केरळ किनारपट्टीवर पाऊस, 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात वर्दी देणार
2. दहावीचा राज्याचा निकाल 77.10 टक्के, बदललेल्या अभ्यासक्रमाची पहिलीच परीक्षा, निकाल घसरल्याने अकरावी प्रवेशासाठी अन्य बोर्डाचे विद्यार्थी सरस ठरण्याची भीती
3. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी 11 धरणं पाईपलाईनने जोडण्याची योजना, लवकरच निविदा काढणार, तर शासनाचा एसएमएस आल्यावरच पेरणी करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला
4. विधानसभा निवडणूक ईव्हीएममार्फत घेतल्यास त्यावर बहिष्कार टाकणार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचे माझा कट्ट्यावर वक्तव्य
5. मराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक, अभिजात भाषेच्या दर्जासाठी नरेंद्र मोदींना पाठवणार 10 हजार पोस्टकार्ड
6. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु, राहुल वायनाडहून परतल्यावर फैसला
7. काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करुया, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
8. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा, आज मालदीव तर उद्या श्रीलंकेला भेट देणार
9. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांमधला वाद चिघळला, 17 जणांवर गुन्हे, बाहेरुन आलेले पुजारी उच्च न्यायालयात याचिका करणार
10. पनवेलच्या तरुणाकडून गोव्यात दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, रेल्वे पोलिसांची कारवाई
माझा कट्टा : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा, एबीपी माझावर, आज रात्री 9.30 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK