1. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत, त्याबाबत फेरविचार शक्य नाही, UGC चे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांची एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्टोक्ती, कायद्याने यूजीसीच्या सूचना सर्व विद्यापीठांना बंधनकारक असल्याचा निर्वाळा https://bit.ly/2ZRpAwa


 

  1. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करुनच घेतल्याचा उदय सामंत यांचा दावा, यूजीसी उपाध्यक्षांच्या मुलाखतीने संभ्रम वाढल्याचं मत, परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय यूजीसीच्या गाईडलाईन्स नुसारच, आता गाईडलाईन बदलल्याचा आरोप https://bit.ly/3eazGxb


 

  1. पुण्याच्या 'सारथी' संस्थेला तातडीने आठ कोटींचा निधी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, सारथीच्या आजच्या बैठकीत खासदार संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्यामुळे समर्थकांचा गोंधळ, अजित पवारांच्या मध्यस्थीने वाद मिटला https://bit.ly/3ef4xsC


 

  1. काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री 2 निवासस्थानाविषयी गंभीर आरोप, ईडीकडून चौकशी सुरु असलेल्या राजभूषण दीक्षितकडून मातोश्री 2 ची खरेदी.. निरुपम यांचे आरोप दखल घेण्याच्या पात्रतेचे नसल्याचं शिवसेनेचं उत्तर https://bit.ly/3iHSmIa


 

  1. महाबीजच्या विरोधात सत्ताधारी युवक काँग्रेसचा एल्गार, महाबीज कार्यालयात एमडींच्या टेबल फेकलं सोयाबीनचं बियाणं, संतप्त आंदोलकांनी महाबीजचं लेखी आश्वासनही फाडलं https://bit.ly/3iEBsdo


 

  1. लोकांसोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही सरकारचं लक्ष, यावर्षीच्या इंडिया ग्लोबल वीकच्या ऑनलाईन उद्घाटनात पंतप्रधान मोदीचं प्रतिपादन, भारतीय औषध उद्योगाने कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी केलेल्या कामगिरीचं पंतप्रधानांकडून कौतुक https://bit.ly/3feBvdW


 

  1. नागपूर पोलिसांच्या शिपायाला लुटमारीच्या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक, रजा टाकून गुडांसोबत मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये लूटमार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबीत https://bit.ly/3gLRCQB


 

  1. यूपीतल्या कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कुख्यात डॉन विकास दुबेला उज्जैनमधून अटक, एका डीएसपींसह आठ पोलिसांची हत्या करुन झाला होता फरार https://bit.ly/3iMMa1G


 

  1. बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची यशस्वी चाचणी करुन रेल्वेचं नव्या युगात पाऊल, पश्चिम रेल्वेच्या जबलपूर विभागाची करामत. डिझेलची बचत आणि पर्यावरणाचं संवर्धन होणार असल्याने रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक https://bit.ly/31Wydbv


 

  1. ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे तीन कुटुंबांना मनस्ताप; रुग्णालयाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला https://bit.ly/38DDQg3


 


BLOG | काय डेंजर 'हवा' सुटलीय? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख  https://bit.ly/3iLprDe

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv